Saturday 16 April 2011

" तू तुझीच अन माझी पण ..."

 " तू तुझीच अन माझी पण ...
          तुझी तूच अन माझी पण ...

संदर्भ विरहीताचा गर्भित तुझ्याच करवी
सुखांच्या मैफिलीत मिरवीत तुझ्याच करवी
जगतांना मैत्रीची ही उधळण नशिबी
आनंदी हे क्षण जीवनाचे तुझ्याच करवी
राग भरणारी तूच  रुसणेही तुझ्याच करवी
तूच समजूत काढणे अन हसणेही तुझ्याच करवी
जीवनाच्या पायवाटांवर सोबत तुझ्याच करवी
सुखांचे काही क्षण अन शेवटही तुझ्याच करवी " ...

तू तुझीच अन माझी पण...


                                                                     - सन्दर्भ-गर्भित...

No comments:

Post a Comment