मी,
वादळाला ओंजळीत घ्यावे
अन सागराचे घोट प्यावे
आसमंताच्या सोबतीने
जणु मी स्वतःला पांघरावे...
चांदण्याची साथ व्हावी
अशी दिवाणी रात व्हावी
सूर्याच्याही तेजावर आता
काजव्यांची मात व्हावी...
पावसाने पेट घ्यावा
मेघांचेही युद्ध व्हावे
तारुण्यातल्या कोवळ्या कळ्यांनी
आता रक्ताचे घोट प्यावे...
मी एक क्षण असा जगवा
स्पंदनांनी विश्राम घ्यावा
सरणावर पेटतांनाही मला
जगण्याचा आभास व्हावा...
-संदर्भ-गर्भित...
No comments:
Post a Comment