" हे बेभान आयुष्य अन मंतरलेले क्षण
ही स्वप्नांची दुनिया त्यात उनाड वेडं मन
या कोवळ्या मखमली तारुण्यात एक पुसटशी आठवण
का पुन्हा जगावंसं वाटतं ते सोनेरी बालपण
हे तारुण्य एक छळ इथं वासना प्रबळ
शापितांच्या नेतृत्वात नागड्यांचा हा गोंधळ
कसा घ्यावा गं विसावा कसा सांभाळावा तोल
जिथं प्रेमाच्या बाजारी भावनाच मातिमोल...
संदर्भ-गर्भित...
No comments:
Post a Comment